शंकराचार्यांच्या दर्शनास सातारकरांची गर्दी

सातारा – सातारा येथील विविध वेदशाळातून निर्माण होणारी नव्या पिढीतील ब्रम्हवृंदाची साखळी यापुढे अशीच निरंतर सुरू राहो असे आम्ही आशीर्वाद देतो अशा शब्दांत श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य जगतगुरू विधुशेखर भारती महास्वामी यांनी सातारा येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चिमणपूरा पेठेतील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत त्यांचे आगमन झाल्यावर दोन दिवसांच्या मुक्कामात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. महास्वामी विधुभारती यांनी माची पेठेतील शंकराचार्य मठाला भेट देवून तेथील वैदिक ब्रह्मवृंदा कडून सुरू असलेल्या वेदशाळा व नित्य उपक्रमाची माहिती घेतली तसेच आद्य शंकराचार्य यांच्या मुर्तीचे पुजन केले.

याप्रसंगी धर्मस्थळ येथील घनपाठी प्रमोदशास्त्री देवस्थळी, अंशुमन अभ्यंकर , शंकराचार्य मठातील वेदमुर्ती शंकरशास्त्री दामले, गोविंदशास्त्री जोशी, श्रीकृष्णशास्त्री जोशी, दत्ताशास्त्री जोशी, मोहन आपटे, ओमकार बोडसे, विश्‍वजित गोडबोले, बापूसाहेब माजगावकर, दत्ता डोईफोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी दत्ता डोईफोडे यांच्या गीतगायनानंतर सायंकाळची पूजा झाली. मंगळवार दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत शंकराचार्याचे थेट दर्शन आयोजित करण्यात आली असून माध्यान्ह पुजा होवून महास्वामींचे बारामतीकडे प्रस्थान होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)