शंकराचार्यांची विजय यात्रा 2 डिसेंबरला साताऱ्यात

सातारा – दक्षिणानाय शारदापीठम (श्रृंगेरी कर्नाटक) पीठाचे विद्यमान शिष्य स्वामी श्री विधुशेखर भारती महास्वामी यांची विजययात्रा सुरू आहे. ही विजययात्रा सातारा येथे रविवार दि. 2 डिसेंबर रोजी दोन दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. चिमणपुरा पेठेतील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत शंकराचार्य महास्वामींचा मुक्काम असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागत समितीचे निमंत्रक वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी दिली आहे.

श्रृंगेरी पीठाचे विद्यमान शंकराचार्य जगतगुरू स्वामी श्रीविधुशेखर भारती महास्वामी भारतभ्रमण करत आहेत. विजययात्रा आगमनानिमित्त दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. धुलीपादुका पूजन, वेदपठन, प्रार्थना, स्वागत भाषण, पुष्पहार समर्पण, प्रास्ताविक व जगतगुरू स्वामींजीचे अनुग्रह भाषण होणार आहे. त्यानंतर सायं 7.30 ते 8 यावेळेत भजन, संगीत, स्तोत्रपठण व हरीकथा होवून जगतगुरू स्वामींजीच्या हस्ते रात्री 8.30 ते 10 यावेळेत श्रीचंद्रमोळेश्‍वर पूजा होणार आहे.

दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 11.30 यावेळेत भाविकांसाठी जगतगुरू स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन, दु.3.30 ते 4.30 यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, सायं.5.30 वा. गुरूवंदना सभा, सायं सायं 7.30 ते 8 यावेळेत भजन, संगीत, स्तोत्रपठण व हरीकथा होवून जगतगुरू स्वामींजीच्या हस्ते रात्री 8.30 ते 10 यावेळेत कार्तिक सोमवार निमित्त श्रीचंद्रमोळेश्‍वर पूजा होणार आहे. दि. 4 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 यावेळेत भाविकांसाठी जगतगुरू स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन, दु.3.30 ते 4.30 यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, भजन होवून सायं. 5 वा. प.पू. स्वामीजींचे बारामतीकडे प्रस्थान होणार आहे. विजययात्रेत सातारकर भक्तजनांना गुरूपादुका पूजन, भिक्षावंदन, वस्त्रसमर्पण पूजन, अर्चन आदी सेवा समर्पित करण्याची सुविधा आचार्य पीठाद्वारे कार्यक्रमस्थळी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)