शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला सुरू होणार

अकलूज- आगामी शैक्षणिक वर्षापासून (2018- 19) सोलापूर विद्यापीठात दरवर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यात येणार असून कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ सिनेट सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी दिली.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्य शासनाच्या वतीने नुकतेच साजरे करण्यात आले.अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनेही माळशिरस तालुक्‍यात व्याख्यानमाला घेण्यात आली. सोलापूर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सहकार महर्षींचे कार्य नव्या पिढीस समजावे आणि त्यांच्या विचारांची ऊर्मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळावी, या हेतूने ही व्याख्यानमाला विद्यापीठ स्तरावर राबवण्यासासाठी आपले प्रयत्न होते, असे स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी सांगितले.
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विद्यापीठाकडे यासंदर्भातील प्रस्ताव ठेवला होता त्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथून पुढे दरवर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाईल, तसेच सोलापूर विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयातून विद्यापीठात कला शाखेतून जो विद्यार्थी पहिला येईल त्यास सहकार महर्षींच्या नावाने सुवर्ण पदक देण्यात येणार आहे. व्याख्यानमालेसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यापीठाच्या लौकिकातही भर पडणार असल्याने सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एन. आर.करमळकर, कुलसचिव गणेश मांझा आणि सर्व संबंधितांचे स्वरुपाराणी मोहते-पाटील यांचे आभार मानले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी विद्यापीठात प्लेसमेंट सुरू करण्यासाठीही आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उच्च शिक्षणात मुलींच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे ते कमी करण्यासाठीही आपण विद्यापीठाकडे पाठपुरावा करत आहोत असेही त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)