शंकरराव मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

अकलूज- शंकरनगर येथील शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मध्ये माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व सचिव शितलदेवी मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी 1989 ते 2017 पर्यंत इयत्ता 10 वी व 12 वी च्या सर्व विध्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी 450 विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच आजपर्यंत झालेले प्राचार्य व शिक्षक असे जवळपास 60 शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच राजसिंह मोहिते पाटील व उर्मिलादेवी मोहिते-पाटील हे ही उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष एस.एम. शिंदे संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत झालेल्या मेळाव्यात सुरवातीला प्राचार्य अल्बर्ट थारकन यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले व माजी विध्यार्थी यांच्या हस्ते सर्व प्राचार्य व शिक्षक यांचा फेटा शाल सन्मानचिन्ह व रोपटे भेट देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर शाळेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी शाळेच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल आम्हाला अभिमान व्यक्‍त केला. संस्थेने केलेली प्रगती, नवीन सुरू झालेल्या विविध शाखा व भविष्यात करावयाच्या योजना संदर्भात माहिती दिली.

-Ads-

त्यानंतर माजी प्राचार्य व माजी विद्यार्थी यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सर्व विध्यार्थ्यांना बॅच नुसार एका एका वर्गात बसवण्यात आले. त्याठिकाणी काही शिक्षकांना शिकविण्याचा आग्रह काही विद्यार्थ्यांनी केला व परत एकदा विद्यार्थी होण्याचा अनुभव घेतला.

एका वर्गात फोटो गॅलरी तयार करण्यात आली होती. त्यात आपले लहानपणीचे आपले फोटो पाहून सगळेच खूष झाले
मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये “लगीर झालं जी’ चे सर्व कलाकार, मालिकेचे निर्माते विद्यार्थ्यांच्या भेटीला आले होते. त्यांनी मालिकेतील संवाद म्हणून दाखवून सर्वांची मने जिंकली.

प्राचार्य अल्बर्ट ठारकन, सुनील कांबळे, शिवाजी गोडसे यांनी मनोरंजनात्मक गीते सादर केली. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांनीही तालावर ठेका धरून नृत्याविष्कार सादर केले. त्या गाण्यावर उपस्थित सर्वानीच ताल धरला. तसेच भैय्या साहेब यांनी देखील आपले पद विसरून आपल्या बॅच च्या विद्यार्थांबरोबर नृत्यावर ताल धरला.

तसेच मा.जि.प.सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील व सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी ही आपला पूर्ण वेळ देत आपल्या बॅचच्या विध्यार्थ्यांबरोबर गप्पागोष्टी केल्या. शेवटी सर्वांच्या करमणुकीसाठीच्या संगीताच्या कार्यक्रमाचाही सगळ्यांनी आनंद घेतला. आपल्या शाळेतील सर्व आठवणी सोबत घेत कार्यक्रम कधी संपला कळलेच नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)