शंकरनगर येथे कुष्ठरोगाबाबत जनजागृती

अकलूज- शंकरनगर (अकलूज) येथे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच देवश्री मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत अन्न सुरक्षा योजनेबरोबरच कुष्ठरोगाबाबत जनजागृती करून कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच देवश्री मोहिते-पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आयोजित ग्रामसभेत गावाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला, तसेच विकासाच्या अनेक मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यावेळी गावातील 74 टक्के लाभार्थींनाच सुरू आसलेली अन्नसुरक्षा भविष्यात शंभर टक्के लाभार्थींना मिळण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी कुष्ठरोगाच्या रुग्णांबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून कुष्ठरोग असलेल्या रुग्णांना समाजात आपुलकी मिळवुन कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ घेण्यात आली.
त्याचप्रमाणे रोजगार हमी योजना, शोषखड्डे आणि जनावरांच्या गोठ्याबाबतच्या सर्व योजनांविषयी माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी उपसरपंच अनिल हंबिरराव देशमुख, तलाठी मोरे, ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर, कृषी सहाय्यक साळुंखे,अंगणवाडी पर्यवेक्षिका कांबळे, चारही जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, पुरस्कार प्राप्त शिक्षक नाचाणे, आरोग्य विभाग कर्मचारी झुरळे, भुसारे नूतन स. पो. नि. विपट, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर, तर आभार उपसरपंच अनिल देशमुख यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)