शंकरनगरमध्ये वादळाबरोबरच विजेचा लपंडाव

अकलुज- येथील परिसरात दिवसभर जीवाची घालमेल करणारा उन्हाळा आणि रात्री वादळ यामुळे खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच शंकरनगर, महर्षी नगर, सुमित्रानगर, सुनयनानगर, स्वरूपनगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत भीतीचे वातावरण आहे.
सध्या अकलूजमधील नागरिकांना बदलत्या वातावरणाचा फटका बसतो आहे. दिवसा तीव्र उन आणि रात्री वादळाचा तडाखा येथील परिसराला बसतो आहे. या वादळामुळे येथील वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. उन्हामुळे त्रस्त नागरिकांना वीज नसल्याने पंखे किंवा कुलर चालू करता येत नाहीत. त्यातच शंकरनगर परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. या समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या अवकाळी पाऊस पडतो आहे. आकलूज परिसरातही असा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे परिसरात पावसाचे पाणी साठून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्याच्या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण आहे. याबरोबरच या भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब झुकले असून, ताराही जुन्या झाल्या आहेत. वादळात हे खांब पडून अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. महावितरणचे अधिकारी याबाबत जबाबदारी झटकत असून, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

  • अकलूज परिसरात वादळामुळे तारा एकमेकांशी घासल्या जात असून झाडांच्या फांद्यामुळेही वीज पुरवठ्यात बिघाड होत आहे. पुढील महिन्यातील वादळवाऱ्याचे दिवस गृहीत धरून दुरुस्तीचे काम सुरू आहे. सध्या 33 के. व्ही.चे दुरुस्तीचे काम झाले आहे. सुमारे महिनाभरात 11 के. व्ही.चे काम होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल.
    एस. एन. मिसाळ, उपकार्यकारी अभियंता, अकलुज

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)