व्होडाफोन-आयडियामधील ५ हजार कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी

मुंबई : व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांमधील प्रस्तावित विलिनीकरणानंतर दोन्ही  कंपनींतील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांचे मिळून २१ हजार कर्मचारी असून त्यात अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्या एकूण एक लाख २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्याने कर्मचारी कपात अटळ असल्याचे एका सूत्राने सांगितले.

दरम्यान, मोबाइल कंपन्यांमधील स्पर्धा वाढत असताना रिलायन्स जिओने अन्य कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर या कंपन्यांचे विलिनीकरण होत आहे. या विलिनीकरणास आवश्यक परवानग्या मिळाल्या असून केवळ केंद्रीय टेलिकॉम मंत्रालयाची परवानगी बाकी आहे. मेअखेर हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल अशी शक्यता आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)