व्हॉलीबॉलमध्ये महिलांनी सहभाग घ्यावा -वाखारे

शिरूर-ग्रामीण भागातील महिलांना व्हॉलीबॉल खेळामध्ये राज्य व देशपातळीवर आपले नाव उंचावण्यासाठी शिरूर शहरात कल्पतरू फौंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेले व्हॉलीबॉल प्रशिक्षण कौतुकास्पद असल्याचे शिरूरच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी सांगून, महिलांनी या खेळामध्ये भाग घेण्याचे आवाहन केले.
शिरूर सेंटर शाळा मैदान येथे शाळा, कॉलेज तरुणी व महिलांसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण सुरू केले. याचे उद्‌घाटन नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेविका मनीषा कालेवार, उज्वला वारे, रोहिणी बनकर, ज्योती लोखंडे, कल्पतरू फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. स्मिता कवाद, डॉ. विजय कवाद, रमेश लामखडे, जयश्री जासूद, संगीता शिंदे, रुपाली लामखडे, डॉ. नूतन क्षीरसागर, गणेश मराठे उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिलांना खेळाकडे आकर्षित होऊन राज्य, देश, व जागतिक पातळीवर आपले, देशाचे नाव उंचावे यासाठी हे व्हॉलिबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. यावेळी रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी सांगितले की, शिरूर शहरात महिलांसाठी व्हॉलिबॉल खेळाचे प्रशिक्षण सुरू करून, ग्रामीण भागात महिला खेळाकडे वळतील. कॉलेज, शाळा यामध्ये व्हॉलिबॉलच्या स्पर्धा असतात; परंतु ग्रामीण भागात या खेळाचे प्रशिक्षण नसल्याने कॉलेज, तरुणी, महिला या खेळाकडे दुर्लक्ष करीत होत्या; परंतु कल्पतरू फौंडेशन यामुळे चांगले खेळाडू तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)