व्हॉट्‌सऍप “सुधारणार’?( भाग २ )

व्हॉट्‌सऍप “सुधारणार’?( भाग १ )

सोशल मीडियाच्या स्पर्धेत सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या व्हॉट्‌सऍपला सध्या फेक मेसेजीसच्या विळख्याने ग्रासले आहे. या फेक मेसेजीसमुळे सामाजिक तणाव वाढत चालला असून त्यातूनच मॉब लिंचिंगसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे भारताने व्हॉट्‌सऍपला याबाबत एक प्रकारे तंबी दिली आहे. फेक मेसेजचे मूळ स्रोत शोधून काढण्यासाठी मार्ग काढा अशी सूचनाही केली आहे. मात्र, हे अत्यंत कठीण आहे. कारण इथे मुद्दा आहे तो युजर्सच्या खासगीपणाचा. युजरचा खासगीपणा जपण्यासाठी संपूर्ण संदेश इनक्रिप्टेड करण्यात येतो. म्हणजेच स्वत: व्हॉटसऍपला देखील कोणत्या संदेशात काय आहे आणि तो संदेश कोठून आला व कोठे गेला, हे देखील कळत नाही.

अफवांचा प्रसार झाल्यानंतर तपास यंत्रणा नेहमीच त्यांची सुरुवात कोठून झाली, हे जाणून घेण्याचा प्र्रयत्न करत असते. अशा स्थितीत व्हॉट्‌सऍप कंपनी ही तपास यंत्रणांना कोणत्याही प्रकारचा पुरावा देत नाही. कंपनीच्या मते, युजरचा खासगीपणा जपण्यासाठी संपूर्ण संदेश इनक्रिप्टेड करण्यात येतो. म्हणजेच स्वत: व्हॉट्‌सऍपला देखील कोणत्या संदेशात काय आहे आणि तो संदेश कोठून आला व कोठे गेला, हे देखील कळत नाही. अर्थात, हे संदेश किती इनक्रिप्टेड असतात, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र संदेशाचे मूळ स्थान शोधता येईल, अशी पद्धत विकसित करावी, असा भारत सरकारचा आग्रह आहे. यासंदर्भात व्हॉट्‌सऍपने कोणतिही हमी दिलेली नाही. मात्र यातील अडचणी सोडवण्याबाबत निश्‍चितच आश्‍वासन दिले आहे.

-Ads-

व्हॉट्‌सऍप कंपनी अमेरिकी असली तरी भारत सरकारच्या आग्रहाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतात त्याचे 20 कोटींहून अधिक युजर आहेत आणि एवढ्या मोठ्या बाजाराला कोणतीही कंपनी गमावू इच्छित नाही. अर्थात, ही समस्या केवळ भारताशी निगडीत नाही. अशा तक्रारी जगभरातील अनेक देशांतून वेळोवेळी मिळाली आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात हल्लेखोरांनी व्हॉट्‌सऍपचा वापर केल्याचे आढळून आले आहे. साहजिकच हा प्रश्‍न जागतिक स्वरूपाचा बनला आहे. म्हणूनच त्याच्या आंतरराष्ट्रीय समाधानासाठी दबाव आणणे गरजेचे आहे. सोशल मीडियासाठी जागतिक पातळीवर एखादा प्रोटोकॉल तयार करणे आवश्‍यक आहे. राष्ट्रीय पातळीवर उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करत असताना आपण खूपच दूर जाणार नाही, हे पाहवे लागेल. ज्या ठिकाणी सोशल मीडियावर बंदी आहे, तेथे अशा प्रकारचे प्रोटोकॉल चालणार नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
4 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)