व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मुख्याध्यापकाकडून अश्‍लील व्हिडीओ

राजगुरूनगर- मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक माहितीसाठी खेड तालुका शिक्षण विभागाने तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर एका मुख्याध्यापकाने अश्‍लील व्हिडीओ टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) दुपारी
सव्वादोनच्या सुमारास घडली आहे.
विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाकडून अशी पोस्ट टाकली गेल्याने इतर शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक माहितीसाठी खेड तालुका शिक्षण विभागाने तयार केलेल्या व्हॉट्‌सऍपग्रुपमध्ये महिला मुख्याध्यापकांची संख्या मोठी आहे. शिक्षकी पेशाला लाजविणारा असा घाणेरडा प्रकार समोर आल्याने भीती पोटी अनेकांनी थेट मोबाईल वापरावर बंदी घातल्याचे बोलले जात आहे.
सकाळची शाळा संपल्यावर शनिवारी (दि. 18) दुपारी 2 वा 52 मि. सुमारास खेड तालुका मुख्याध्यापक 1 या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांनंतर या ग्रुपवर होणारी शैक्षणिक चर्चा बंद झाली व दबक्‍या आवाजात याची कुणकुण तालुकाभर व जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरली. दरम्यान हा व्हॉट्‌सअप ग्रुप गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकांजाच्या हेतूने तयार केला असून या ग्रुपमध्ये 180 पेक्षा अधिक सदस्य असून बहुतांश महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्याचा शिक्षण विभाग यावर काय कारवाई करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या ग्रुपच्या ऍडमीनसह व्हिडीओ टाकणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुक्‍यातील शिक्षिकांनी व शिक्षकांच्या विविध संघंटनांनी केली आहे.

  • ज्या मोबाईलवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या शाळा प्रमुखाचा मोबाईल त्या दिवशी सकाळी चोरीला गेला आहे. तशी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल आहे. शिवाय आणखी काही व्हायरल होऊ नये म्हणून ज्या कंपनीचे सीम कार्ड आहेत. तेही बंद करण्यात आले आहेत. तरीही हलगर्जीपणा म्हणून या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे.
    संजय नाईकडे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खेड तालुका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)