व्हॉट्‌सऍपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर गुन्हा

इंदापूर-व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील व्हॉट्‌सऍपच्या “ओंकार ग्रुप’मध्ये सदस्य असणाऱ्या अनिल नामदेव कांबळे (रा. इंदापूर) याने व्हॉट्‌सऍप ग्रुपला इस्लाम धर्माची बदनामी होईल अशा प्रकारचा मजकूर टाकून भावना दुखावल्या असल्याच्या कारणावरून मोहसीन कादर शेख (रा. कसबा, इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर करत आहेत. या संदर्भात अनिल कांबळे यांच्या नातेवाईकाने सांगितले की, अनिल हा अतिशय शांत स्वभावाचा आहे. त्याचे पेठेत चप्पल दुकान आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हाची नोंद त्याच्या नावावर नाही. आलेल्या मेसेजमध्ये उर्दू धार्मिक शब्द होते. त्यामुळे अर्थ लागला नाही. त्याच्याकडून तो मेसेज पुढे पाठविला गेला. कोणाच्या ही धार्मिक भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)