व्हॉट्‌सऍपमध्ये ग्रुप कॉलिंगची सुविधा 

सॅन प्रॅन्सिस्को: अलिकडे संभाषण करण्याची माध्यमाची होत जाणारी वाढ व त्यातून देण्यात येणाऱया ग्राहकांना सुविधा यामुळे नवीन काय याकडेच सर्वाचे लक्ष्य केंद्रीत करत असते. आता व्हॉट्‌सऍप या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण एकाच वेळी चार जणासोबत व्हिडीओ आणि ऑडिओ असा संवाद करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणाही व्हॉट्‌सऍपकडून करण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी आपण आपले मोबाईलमधील ऍप अपडेट करून घेण्याची गरज आहे.
त्यानंतर कोणत्याही एका व्यक्तीला व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलिंग करावा आणि यातील डाव्या बाजूला असणाऱया ऍड पार्टीसिपेन्ट यावर टॅप करून व्यक्तींना सहभागी करता येते. अशा प्रकारे आपण तीन लोकांशी एकाचवेळी संवाद साधू शकतो. 2014 मध्ये चालू करण्यात आलेल्या व्हॉईस कॉलिंगमध्ये 2016 मध्ये व्हिडीओ कॉलिंगचे फिचर्स सुरू करण्यात आलेत. एका दिवसात दोन अब्ज मिनिटे युजर्स कॉलिंग करतात, असा दावा कंपनीकडून करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)