व्हॉटसऍप फ्रेंडस…

वृषाली वजरीणकर

एका व्हॉटसऍपच्या मैत्रीण समुहात मोबाईल आणि त्यामुळे आजकालचे बदलेलेल स्त्रियांचे जग यावर चर्चा चालू होती.
सगळ्या आपापल्या क्षेत्रात काम सांभाळून मोठ मोठ्या पदावर अथवा असेच काही कार्य क्षेत्रात नाव सांभाळून असलेल्या हा आमच समूह तसा हुशारच आहे ,तर यावर एक जेष्ठ लेखिकेने प्रतिक्रिया लेख मागवले .शक्‍यतो सकारात्मक अशाच स्वरूपाचे असावेत अस त्यांचे म्हणणे होत ,मला पटल …नकारघंटा आणि याचे तोटे लिहून घोटून झालेच होते ,तर हे का नको …

कोणाकडे कोणता मोबाईल आहे ते त्याचा कसा वापर केला जातो इथपर्यंत चर्चासत्र रंगत आले ,मी माझे काही अनुभव मांडले …
मग स्मार्ट फोन हि आपली गरज बनत गेली ,यातून तुम्ही काय घेतल ते महत्वाचे आहे …खरच काही करू इच्छिणार्याला मार्गदर्शक ठरलेला हा छोटासा यंत्र एखाद्या लेखिकेच्या प्रतिमेला ,एखादीच्या कलेला दूर दूरपर्यंत पोहाचावाण्य्चे काम करायल लागले आणि कलाकारांचा उत्साह दिवसेगणिक वाढत गेला ,अडगळीत पडलेला साहित्य अक्षरशः बाहेर आले आणि कुठतरी कार्यरत झाले उमटले ,टिपले ,सरासर चढलेला गंज निघाला आणि एक लखलखीत अवतार रूप घेऊन समोर यायल लागल ,कोणाची बुद्धी लेखणी द्वारे तर कोणाचे डोळे कॅमेरा मध्ये टिपणे तर कोणाचा कुंचला रंगात बुडवून विविध चित्रे ,अक्षरे बनवू लागला ,आपल साहित्य लेख आपली चित्रे आपली कला पाहणारे पाठवणारे समूह बनू लागले तसे त्याचा आणखीच प्रभाव वाढला ,प्रदर्शने व्याख्याने आणि काय काय… कलादालने हि या माध्यमातून एकमेकांना आव्हान करू लागली ,
चुरस लागली सकाळ दुपार संध्याकाळ विविध विषयांवर चार ओळी तरी लिहिण्या वाचण्याची ओढ हि या यंत्रात सामावून गेली ,कोण कुठून कसे माहीत नाही पण भराभर आपल्या मनातल अंतरंगातल्या नाना कला अशा उर्जा घेऊन बाहेर पडू लागल्या, त्या सर्वत्र पोहोचवण्याच्या या माध्यमामुळेच जमले ,
मीही त्यातलीच एक ..शाळेपासून विविध विषयवार कविता रचलेल्या छोटे मोठे अनुभव कथन ,पण कधी वाटले नाही कि याचे अशा छान लेखात रुपांतर होईल ,आणि अशाच माझ्या चारोळ्या कविता लेख विचिध माध्यम ,अंकात झळकू लागले ,पटकन वाचायला आणि पोहचवायला या नवी ुहरीींरर ,िारळश्र चा उपयोग नक्कीच झाला असे म्हणींर येईल.

चार ओळी कधी वाचू म्हणून टाळाटाळ करणाऱ्या महिला हाताशी अल्लेल्या मोबाईल मध्ये सहज छानसे लेख वाचू लागल्या, त्यावर चर्चा करणे सहभागी होणे ,अबोल स्त्रीही प्रतिक्रिया देऊ लागली ..

असे आणि किती कलाकारांना नातेवाईकांना आपली आवड कला पोहोचवताना जो आनंद मिळाला तो अवर्णनीय ….सहज आपल्या लहान मुलांचे कोड कौतुक, कुटुंबाचे संमेलन, एखादे स्पर्धा ,बक्षिसे यांचे फोटो सहज पाठवण्यात आनंद मिळत गेला ,अभ्य्साचे साहित्य ,आणि इतर काही उपयोगी …असे बरेचसे सांगता येईल, तर…
म्हणून काय आपण बोलणे थांबवले काय ,नाही अजूनही आपण वेळ मिळेल तसे आपल्या माणसांशी फोन करून बोलू शकतो ,हे ज्याच्या त्याच्या वेळ आणि स्वभावावर आहे ….तुम्हाला अजूनही खूप छानसे बरेच काही आठवत असतील मोबाईल व्हात्साप चे फायदे, माहितीय …..आठवून खुदकन हसू नका..सुंदर वैचारिक लेख आणि क्षेज्ञशी नि मन कस प्रसन्न होत न …कधी कधी ,कुठे रांगेत उभे राहून व बसून कंटाळवाणे वाटले कि छान लेख काढून वाचत बसू शकतो …एवढच काय, आम्ही तर असे ग्रुप्स वर वैचारिक सामाजिक विषय मांडून त्यावर खूप छान छान लेखक तयार केले आहेत बर….

अनेक साहित्य संमेलनाच्या पत्रिका, निमंत्रण पत्रिका या जास्त प्रमाणात यावर दिल्या जातात तरीही ज्यांना प्रत्यक्ष आमंत्रणाची आवड आहे, पद्धत माहित आहे ते याला फारसे महत्व देत नाहीत , भेटून देतात, तरीही कार्यक्रमाची रूपरेषा ही व्व्हाट्‌सअप व इतर माध्यमामुळे लवकर कळते हा फायदाच होय ..आठवण राहते,.अशा प्रकारे चित्र, लेख, कविता आणि सहज वाचता येणारे माध्यम म्हणून याचा आपण वापर योग्य वेळी केला तरच ते तुमचे मित्र बनतील ,आता हे सगळे लिहून वृत्तपत्रात छापून पुन्हा तुम्ही ते इ रिशिी आणि ुहरीींरर विरही वाचू शकता बरे का …तरीही एक सांगावेसे वाटतेच ,खमंग वासाचा करकरीत पेपर हातात धरूब चडचड फडफड आवाज करत चहाचा घोट घेत पानं उलटन्यात जी मजा येते ना ती अजून नाही जमली हो या ुहरीर अिाणि इ वाचनाला ..काय खरय न .?.तर छोट्या बालकापासून ते वृद्ध आजी आजोबा पर्यंत झपाट्याने झपाटलेला हा नवीन ोलळश्रश आणि त्यावर असलेले इंटरनेट तसा भारीच भारी पडला आहे …हे वाचताना तुम्हाला नजरेसमोर अतिशय भयानक आणि काही गैरसोयीचे, तोटे आणि दुरुपयोग डोळ्यासमोर येत असतील ,नक्कीच ते सर्वांना माहित आहेत असे गृहीत धरूनच सकारात्मक उपयोग ,वापर अपेक्षित आहे …!!!धन्यवाद ..तर चला मग
तुम्हीही छानसे व्हाट्‌सअप वर हा लेख लगेच शेअर कराल अशी आशा करूया ..!!.

मैत्रिणींनो सकारात्मकतेने याचा वापर योग्य वेळी केल्यास तुमची मैत्रीण/ मित्र मोबाईल तुमच्यावर रुसणार नाही कधीच हा!..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)