व्हॉटसअपचा वापर चांगल्या संवादासाठी करा 

रवि गुरिया : व्हॉटसअपतर्फे आयोजित कार्यशाळेस प्रतिसाद

सातारा – जगभरात 200 मिलियन लोक व्हॉटसअपचा वापर करतात मात्र, त्या माध्यमातून येणाऱ्या फेक न्युजमुळे काही ठिकाणी सामाजिक अशांतता निर्माण झाली तर काही ठिकाणी दंगली घडल्या आहेत. या फेकन्युज कशा ओळखाव्यात व व्हॉटसअपचा चांगला वापर कसा करावा यासंदर्भात सातारा जिल्हा पोलीस व व्हॉटसअपतर्फे डिजिटल इमपॉवरमेंट फौंडेशनने आयोजित केलेल्या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद लाभला.

-Ads-

दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेत सातारा पोलीस तसेच विविध कॉलेजमधील युवक, युवतींना मार्गदर्शन करताना डिजिटल इमपॉवरमेंट फौंडेशनचे रवि गुरिया यांनी व्हॉटसअपचा वापर चांगल्या संवादासाठी करा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी व्हॉटसअपच्या विविध फीचर्सचा वापर कसा करावा याबाबतही सविस्तर माहिती दिली. राज्यातील पहिली कार्यशाळा सातारा जिल्हा पोलीस व व्हॉटसअपतर्फे डिजिटल इमपॉवरमेंट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अलंकार हॉलमध्ये पार पडली.

सकाळच्या सत्रात पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांसाठी झालेल्या कार्यशाळेत व्हॉटसअपचा वापर, त्यातून निर्माण होणारे विसंवाद, अफवांचे पीक यासंदर्भातील पडणाऱया पोस्टमागील व्यक्तींचा शोध कसा घ्यावा. गुन्हेगारीत व्हॉटसअपचा वापर झाला असल्यास त्याबाबतचे पुरावे कसे मिळवावेत, फेक न्युज कशी ओळखावी, त्याचा सोअर्स कंपनीकडून कसा मिळू शकतो याबाबतची माहिती रवि गुरिया यांनी दिली.

यावेळी पोलीस कर्मचाऱयांकडून फॉर्म भरुन घेवून सर्व्हेही घेण्यात आला. या कायशाळेचा शुभारंभ जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या हस्ते झाला यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)