व्हॅन भाड्याने देतो असे सांगत 20 हजाराची फसवणूक

 

कुलींग व्हॅन भाड्याने देतो असे सांगत उबंरी ता. महाबळेश्‍वर येथील शेतकऱ्याला तब्बल 20 हजाराचा गंडा घातल्याची तक्रार पाचगणी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

उंबरी येथील शेतकरी शशीकांत शिवराम उंबरकर (वय 39) हे स्ट्रॉबेरीची शेती व व्यापार करतात. त्यांना मारुती रोड कॅरीअर अँड कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत कुलिंग व्हॅन भाड्याने हवी असल्यास बॅंकेत 20 हजार रक्कम जमा करण्यास सांगितली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार उंबरकर यांनी एका बॅंकेच्या खात्यातून मारुती रोड कॅरीअर अँड कंपनीच्या त्या अधिकाऱ्याने सांगितलेल्या बॅंक खात्यावर 20 हजाराची रक्कम जमा केली होती.

7त्यानंतर कंपनीने त्यांना कसलाही संपर्क केला तर नाहीच पण व्हॅन भाड्याने देण्यास टाळाटाळ केल्याने उंबरकर यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याची तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)