व्हॅन दरीत कोसळून उत्तराखंडमध्ये 13 ठार

डेहराडून – उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात एक टेम्पो ट्रॅव्हलर व्हॅन खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात तेरा जण ठार झाले तर अन्य दोन जण गंभीररित्या जखमी झाले. ऋषिकेष गंगोत्री मार्गावर भतरावती गावाजवळ 8 किमी अंतरावर हा अपघात घडला. या टेम्पोत एकूण पंधरा प्रवासी होते.

पावसामुळे या मार्गावर त्या ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्याचा ढिगारा चुकवून पुढे जाण्याच्या प्रयत्नात चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि तो टेम्पो सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत दोनशे मीटर आत कोसळून हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यातील दोन लहान बालिका असून त्यांचे वय 13 आणि 15 वर्षांचे आहे. दोघा जखमींना डेहराडूनच्या हॉस्पीटल मध्ये नेण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)