व्हॅन आणि ट्रकच्या धडकेत नऊ ठार

लखीमपुरखेरी (उत्तरप्रदेश) – उत्तप्रदेशात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 वर एक भरधाव वेगाने जाणारी एक व्हॅन ट्रकला धडकून झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाले तर अन्य सात जण जखमी झाले. हा अपघात पगवान पोलिस स्टेशनच्या हद्दीत उचौलीया येथे झाला. मृतांमध्ये व्हॅनचा चालक आणि त्याच्या सहायकाचाही समावेश आहे.

सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला. व्हॅन भरधाव वेगात होती त्यामुळे चालकाचे तिच्यावरील नियंत्रण सुटून ती समोर ट्रकवर जाऊन आदळली. स्थनिक नागरीकांनी जखमींना जवळच्या रूग्णालयांत दाखल केले. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटायची आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)