३९ भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी व्ही के सिंग इराकला जाणार

नवी दिल्ली : आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत बोलताना दिली होती. आयसिसच्या हल्ल्यात ठार झालेल्या भारतीयांचे मृतदेह इराकहून भारतात आणण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग १ एप्रिलला इराकला जाणार आहेत.

याआधी परराष्ट्र मंत्रालयाने एका आठवड्यात मृतदेह भारतात आणले जातील अशी माहिती संसदेत दिली होती. आयसिसच्या हल्ल्यात एकूण ३९ भारतीय ठार झाले होते, मात्र त्यामधील एका भारतीयाचा डीएनए अद्याप जुळलेला नसल्याने त्याचा मृतदेह मिळण्यास उशीर लागणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)