“व्हीव्हीपॅट’चे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे

सुनील अरोरा यांच्या सूचना : पुणे विभागाचा निवडणूक विषयीचा आढावा

पुणे – निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी निवडणुकीसंबंधी तसेच इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्या आहेत.

-Ads-

शासकीय विश्रामगृह येथे पुणे विभागाचा निवडणूक विषयीचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी या सूचना दिल्या. यावेळी पुणे विभागाचे मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे शिरीष मोहोड, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, साताऱ्याच्या उपजिल्हाधिकारी पूनम मेहता, सांगलीचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुनील अरोरा यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील मतदार नोंदणी संक्षिप्त पुनर्निरिक्षण मोहीमेंतर्गत मतदार नोंदणी, दिव्यांग मतदार नोंदणी, तसेच इव्हिएम मशीनच्या प्राथमिक स्तरावरील तपासणी व त्याबाबत जनजागृती नियोजन याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी अरोरा म्हणाले, सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमावर भर देताना मतदार जागृतीसाठी योग्य नियोजन करावे. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

नवीन मतदार नोंदणीसाठी 2 लाख अर्ज
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीचा जिल्हानिहाय आढावा दिला. तसेच विभागात नवीन मतदार नोंदणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रात दर रविवारी तसेच प्रत्येक मंगळवारी प्रत्येक महाविद्यालयात घेतलेल्या विशेष शिबीराची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीसाठी 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार नोंदणीसह सुरू असलेल्या सर्व निवडणूक विषयीच्या कामाचा आढावा त्यांनी सादर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)