व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशनसाठी सिद्धीविनायक न्यासाकडून १० कोटी रुपये

मुंबई – राज्यातील खेड्यांच्या परिवर्तनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशन) साठी श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० कोटी रुपयांचा धनादेश दिला. श्री सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी हा धनादेश आज विधानभवनातील कार्यक्रमात दिला.

राज्यातील एक हजार खेड्यांचे रूपांतर आदर्श खेड्यामध्ये करुन त्यामध्ये शाश्वत विकासासह ती सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्य शासनाकडून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या सहाय्यासाठी सिद्धीविनायक न्यासाकडून १० कोटी रुपये इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. या अर्थसहाय्याचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आमदार सुनील प्रभू, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, श्री. सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारिख, आनंद राव, संजय सावंत, महेश मुदलियार, गोपाळ दळवी, सुबोध आचार्य, विशाखा राऊत, पंकज गोरे, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)