सलमान खानच्या ‘भारत’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित 

सलमान खानचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपटचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून सलमान खानचे चाहते या सिनेमाची वाट पाहत होते. टीझरची सुरुवात सलमान खानच्या आवाजाने होते. ‘अक्सर लोग मुझसे पूछते हैं कि मेरा सरनेम क्या है, जाति क्या है, धर्म क्या है और मैं उनसे मुस्कराकर कहता हूं कि इस देश के नाम पर मेरा बाबूजी ने मेरा नाम भारत रखा। अब इतने बड़े नाम के आगे जाति, धर्म या सरनेम लगाकर ना तो अपना और ना ही इस देश का मान कम कर सकता हूं।’ असे म्हणत टीझरमध्ये सलमान खान धमाकेदार एंट्री घेत आहे. या एका मिनिटाच्या टीझरमध्ये सलमान नौसैनिक, मॅकेनिक अशा वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शित ‘भारत’ चित्रपट हा ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. सलमान-कतरीना यांच्याशिवाय ‘भारत’मध्ये तब्बू, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर आदी कलाकार झळकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)