#व्हिडीओ : विद्यापीठातील होस्टेलमध्ये डीपीचा स्फोट

विद्यार्थ्यांमध्ये घबराट, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील होस्टेल नंबर तीनच्या दुसऱ्या मजल्यावरील विजेच्या डीपीला आज सकाळी अचानक आग लागली. याठिकाणी असलेल्या सर्व वायरींग या उघड्या असल्याने दोन-तीन वेळा मोठा स्फोट झाला. हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, विद्यार्थी राहत असलेल्या या होस्टेलमध्ये तीनही मजल्यावर उघड्या वायरींग आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील होस्टेल नंबर तीनमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक मोठ्याने स्फोट होऊ लागल्याने हा प्रकार विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. यानंतर विद्यार्थ्यांकडून तातडीने स्थानिक रेक्टर यांना घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे होस्टेलमधील लाईट गेली अाहे. होस्टेल नंबर तीनमध्ये सुमारे 74 रुम असून 200 ते 250 विद्यार्थी राहत असल्याचे येथील विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

उघड्या वायरींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

होस्टेल नंबर तीनमध्ये तीन मजले असून तीनही मजल्यावरील वायरींग, डीपी उघड्याच आहेत. यासंदर्भात विद्यापीठाला वारंवार सांगूनही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे विद्यापीठाचे होस्टेलच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

एका रुममध्ये चार-पाच विद्यार्थी 
होस्टेल नंबर तीन मधील रुम आकाराने लहान असून यापूर्वी एक रुम दोन जणांमध्ये दिली जात होती. मात्र, सद्यस्थितीत एका रुममध्ये चार ते पाच विद्यार्थी दाटीवाटीने राहत आहेत. जास्त विद्यार्थ्यांना राहता यावे यासाठी प्रशासनाने दुमजली बेड खरेदी केले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)