व्हिडीओ: राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

भाजपचे विद्यमान आमदार राम कदम यांनी दहिहंडीनिमित्ताने घाटकोपर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये काल एका युवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘जर तुमच्या आई-वडिलांना मुलगी पसंत असेल तर त्या मुलीचा नकार असला तरी मी तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’ असे वादग्रस्त विधान करतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राम कदम यांच्या या ‘बेताल’ वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राम कदम व सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर याप्रकरणी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राम कदम यांना खडे बोल सुनावले आहेत.

“राम कदम हे मुलींना काय समजतात? एकीकडे बेटी बढाओ, बेटी पढाओचा नारा देयचा आणि दुसरीकडे अशी विधाने करायची हे कितपत योग्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्याची तक्रार करावी तर महिला आयोग देखील भाजपाचेच असल्याने न्याय मिळणे अवघड आहे.” असे देखील त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)