#व्हिडीओ: मराठा आरक्षणास अजित पवारांचा पाठींबा

बारामती: माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग येथिल निवास्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या तसेच घंटनाद आंदोलन करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ नेते पवार यांचे पुतणे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग घेतल्याने अजित पवार आंदोलनात कसे सहभागी झाले? असा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला असताना पवार साहेबांचाही आरक्षण मागणीला पाठींबा असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अजित पवार हे पाठींबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्यभरात झालेल्या आंदोलनांपैकी हे आंदोलन महत्त्वाचे ठरले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्येष्ठ नेते पवार यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर देशात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे तर घटनादुरुस्तीला मदतही करू, अशीही भूमिका मांडत होते. पवार यांच्या तिहेरी भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाल्याने पवार यांच्याच बारामतीतील घरा समोर आंदोलन करण्यात आल्याने याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र, या आंदोलनात पवार यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सहभाग घेतल्याने मराठा समजातून समाधान व्यक्त करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)