#व्हिडीओ : ‘भाजपला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

खासदार राजू शेट्टी यांचा भाजपाला इशारा

कोल्हापूर – आम्ही ठरवलं. विश्वासघातकी स्वार्थी जनता पक्षाला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसवायचं नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसंच मी एक जाणकार शेतकरी आहे. शिवारात कमळ फुलवण्यात माझा हात होता परंतु आता तण नाशनक फिरवून मी समूळ उच्चाटन करणार असल्याचं देखील शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

तसंच मी दिवसभर माझ्या मतदारसंघात आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझी चर्चा झालेली नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. माझ्या विरोधात खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. मी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. भाजप नेत्यांसोबत संपर्क केल्याच्या बातम्या येत असताना शेट्टी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)