#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार 

नवी दिल्ली – मध्यप्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून भाजप आणि काँग्रेस जोरदार प्रचार करत आहेत. उज्जैन जिल्ह्यात भाजपचे उमेदवार दिलीप सिंह शेखावत यांना जनसंपर्क अभियान करणे चांगलेच महागात पडले आहे. अभियानांदरम्यान एका तरुणाने शेखावत यांना चप्पलेचा हार घातला. या कृत्याने संतप्त होत शेखावत आणि त्यांच्या समर्थकांनी त्या तरुणांची धुलाई केली आहे.

-Ads-

दिलीप सिंह शेखावत नागदा खाचरोद विधानसभा जागेसाठी भाजपकडून उभे आहेत. सोमवारी निवडणुकीसाठी जनसंपर्क अभियानासाठी ते खेडवादा गावात पोहचले. या अभियानादरम्यान शेखावत लोकांचे आशीर्वाद घेत होते. यावेळी एका वृद्ध माणसाचा आशीर्वाद घेण्यासाठी वाकले असता एका तरुण अचानक गर्दीतून बाहेर आला आणि काही समजण्याच्या आतच शेखावत यांना चप्पलेचा हार घातला. हे पाहून शेखावत आणि त्यांचे समर्थक चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या तरुणाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, दिलीप सिंह शेखावत यांनी या घटनेसाठी काँग्रेसला जबाबदार सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)