#व्हिडीओ : दुबईत भारतीय फुटबॉल चाहत्यांना पिंजऱ्यात कोंडून धमकावले

दुबई – दुबईत राहणाऱ्या भारतीय फुटबॉल चाहत्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवून धमकवल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडियो पाहिल्यानंतर यूएईच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून अनेक जणांना अटक केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

एएफसी एशियन कप स्पर्धेच्या भारत आणि यूएई सामन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. या सामन्यात भारत 2-0 अशा फरकाने पराभूत झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये अनेक भारतीय फुटबॉल चाहत्यांना पक्ष्यांचा एका पिंजऱ्यात बंद केल्याचे दिसत आहे. पिंजऱ्यासमोत एक माणूस हाती सोटा घेऊन उभा आहे. सोट्‌याने धमकावत पिंजऱ्यातील बंद माणसांना तो विचारतो, की भारत-यूएई सामन्यात तुम्ही कोणाची बाजू घेणार? त्यांनी भारताची असे उत्तर देताच सोटा उगारून तो म्हणतो, तुम्ही दुबईत राहता म्हणून तुम्ही यूएईच्या संघाची बाजू घेतली पाहिजे. समजले? आणि तो पुन्हा विचारतो की भारत-यूएई सामन्यात तुम्ही कोणाची बाजू घेणार? या वेळी सर्वजण सांगतात-यूएईची.

या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून व्हिडियो तयार करणाराला अटक झाली आहे. ज्याच्यासाठी त्याने व्हिडियो तयार केला, त्याच्या नावे अटक वॉरंट जारी झाले आहे. ही केवल गुन्हेगारीचीच बाब नाही, तर सहिष्णूता आणि सन्मानाच्या मूल्यांचा तो भंग आहे. आम्ही समान संधी आणि गुणवत्तेल महत्त्व देतो. हा दंडनीय अपराध आहे, असे ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान व्हिडियोच्या मालकाने आणखी एक व्हिडियो पोस्ट केला आहे. त्यात ही सारी गंमत होती, हे सारे माझे कर्मचारी असून आम्ही एका ताटात जेवतो. कृपया माझी ही चेष्टामस्करीची भावना समजून घ्या अशी विनंती त्याने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)