#व्हिडीओ: इंधन दरवाढी विराेधात शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा निषेध माेर्चा

दुचाकीची हातगाडीवर मिरवणूक काढून सरकारला ड्रॉप भेट
मुकुंद ढाेबळे -शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढ व वाढत्या महागाई विरोधात साेमवारी शिरूर तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी दुचाकीची हातगाडीवर मिरवणूक काढून, सरकारला ड्रॉप भेट देण्यात आला. अनेक दुचाकीवर या ड्रॉपने पेट्रोल टाकून सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीची खिल्ली उडवली. नायब तहसीलदार एस. यू. शेख यांना निवेदन देण्यात आले.
कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, शिरूर पंचायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, बाजार समिती उपसभापती विश्वास ढमढेरे, महिला तालुका अध्यक्ष विद्याताई भुजबळ,  युवती अध्यक्षा संगीता शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, कार्याध्यक्ष रंजन झांबरे,  पल्लवी शहा,  संतोष भंडारी,  कुंडलिकराव शितोळे, विजेंद्र गद्रे, बाबासाहेब फराटे,  दत्तात्रेय फराटे, निलेश पवार, हाफिज बागवान, कलीम सैय्यद, हरिदास कर्डिले, महेश देशमुख,  प्रतीक काशीकर, साकीब खान, राहील शेख, हर्षद ओस्तवाल  व मोठ्या संख्येने  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुजाता पवार म्हणाल्या, देशात आणि महाराष्ट्रात असलेल्या भाजप सरकार हे आश्वासन  आणि जाहिरातबाजी करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण सत्ता मिळवत आहे. डिझेल-पेट्रोलची दरवाढ महिन्याला दहा ते पंधरा रुपये करून, कमी करताना मात्र पाच ते दहा पैशाने करीत असल्याचा आहेत. रोज होणारी डिझेल व  पेट्रोलची दरवाढ यामुळे देशात आणि राज्यांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे; परंतु  हे सरकार नागरिकांना खोटी आश्वासने देऊन फसवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही दरवाढ लवकरात लवकर कमी न  झाल्यात यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे म्हणाले की, चार वर्षांपूर्वी लोकांनी मोठ्या विश्वासाने देशात नरेंद्र मोदी सरकार व राज्य मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार यांना निवडून दिले आहे. मात्र या सरकारने सर्वच बाबींमध्ये लोकांची फसवणूक केली आहे.  शेतीमालाला भाव नाही, रोज वाढणारी पेट्रोल आणि डिझेल दरवाढ यामुळे व्यापारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असून या सरकारने या सर्वांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
72 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)