व्हिडीओकॉनचे 3 हजार कोटीचे कर्ज वादात ; चंदा कोचर गोत्यात ?

मुंबईव्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपने कर्ज दिले होते. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावाने कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती.

मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली. दीपक कोचर यांना अवघ्या 9 लाखात कंपनी देणाऱ्या वेणुगोपाल धूत यांना, सहा महिन्यापूर्वीच चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बँकेने मोठं गिफ्ट दिलं होतं. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेने तब्बल 3 हजार 2 50 कोटी रुपयांचं कर्ज दिले. मात्र त्यातील 86 टक्के कर्ज म्हणजेच 2 हजार 810 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पण आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्यावर मेहरबानी दाखवत, 2017 मध्ये त्यांचे खातं NPA म्हणजेच एकप्रकारे बुडीत दाखवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)