#व्हिडिओ : कर्नाटकमध्ये चक्क माकडाने चालविली बस 

नवी दिल्ली – सर्कसमध्ये तुम्ही अनेकवेळा माकड, हत्ती, कुत्र्यांना गाडी चालविताना पहिले असेल. मात्र, खऱ्या आयुष्यात कधी तुम्ही माकडाला गाडी चालविताना पहिले आहे का? नाही ना. परंतु, अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. माकडाने चक्क बसच रस्त्यावरून चालवली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये बसचा चालक त्याच्या ड्राईव्हर सीटवर आरामशीर बसलेला दिसत असून माकड स्टेअरिंगवर बसलेले दिसत आहे. व चालक गिअर टाकत असून माकड व चालक दोघे मिळून बस चालवीत आहेत. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून माकडच्या हातात स्टेअरिंग देणे चालकाचा आता चांगलेच महागात पडले आहे. कारण हा व्हिडीओ व्हायरल होताच  कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने बसच्या चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)