‘व्हिडिओकॉन’ला१४ कोटींचा दंड

नवी दिल्ली  : ‘फॉरेन लॉ अॅक्ट’चा भंग केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वेणूगोपाल धूत यांच्या ‘व्हिडिओकॉन’ समूहाच्या सहा कंपन्यांना १४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिवाय धूत, व्हिडिओकॉन आणि सहा कंपन्यांच्या संचालकांनाही ४५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी ३० लाख रुपयांचा दंड एकट्या वेणूगोपाल धूत यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. ‘ईडी’ने २६ मे रोजी हे आदेश दिले.

व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना वितरित करण्यात आलेले कर्ज आणि समूहाच्या एका कंपनीत विदेशी गुंतवणूकदाराकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीबाबत ‘ईडी’तर्फे चौकशी चालू असून, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय देण्यात आला आहे.  ‘व्हिडिओकॉन’ समूहाच्या सहा कंपन्यांनी १० जानेवारी २००६ला केमन आइसलँडमध्ये जॉइंट व्हेंचरमध्ये टस्कर ओव्हरसीज या कंपनीची स्थापना केली. आयसीआयसीआय बँकेच्या विदेशी शाखेने ‘टस्कर’ला कर्ज देण्यात आल्याने या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेची नजर पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘टस्कर’ने ही कर्जाची रक्कम ‘व्हिडिओकॉन’ समूहाच्या भारतीय आणि विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवला. ‘व्हिडिओकॉन’ला चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाच्या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ‘व्हिडिओकॉन’ने केलेल्या गुंतवणुकीचा उल्लेख २०१६ मध्ये प्रथमच रिझर्व्ह बँकेच्या गोपनीय अहवालात करण्यात आला. या विषयी रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केल्याचे वृत्त ‘इकनॉमिक टाइम्स’ने १२ एप्रिलला प्रसिद्ध केले होते. मात्र, हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)