व्हिजन अकादमी संघाची खराडी जिमखानावर मात

पुणे – अभिजीत जाधव आणि कमलसिंग यांची दमदार फलंदाजी आणि अद्वय शिदयेची प्रभावी गोलंदाजी अशा सांघिक कामगिरीच्या जोरावर व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने खराडी जिमखाना संघाचा 26 धावांनी पराभव करताना विराट चषक 19 वर्षांखालील टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.
व्हिजन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेली ही स्पर्धा पुणे क्रिकेट अकादमीने आयोजित केली आहे. व्हिजन क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 17 षटकांत 9 बाद 135 धावांची मजल मारली. त्यानंतर खराडी जिमखाना संघाचा डाव 20 षटकांत 9 बाद 114 धावांवर रोखताना व्हिजन अकादमी संघाने चमकदार विजयाची नोंद केली. केवळ 9 धावांत 4 बळी घेणारा अद्वय शिदये सामन्याचा मानकरी ठरला.
त्याआधी पहिल्यंदा फलंदाजी करणाऱ्या व्हिजन अकादमी संघाने 17 षटकांत 9 बाद 135 धावांची मजल मारली. अभिजीत जाधवने 62 धावांची शानदार खेळी केली. तर कमल सिंगने 23, स्वरदीप खेनटने 14 व शुभम वेलणकरने 12 धावा करताना त्याला सुरेख साथ दिली. खराडी जिमखानाकडून अविनाश जसरोटिया व पूनम खेमनार यांनी 2-2 बळी घेतले. त्यानंतर महेश म्हस्के (27) व धीरज फतांगडे (24) यांनी दमदार सलामी दिल्यावर ऋषी राऊत (32) वगळता खराडी जिमखानाचे बाकी फलंदाज अपयशी ठरले व त्यांना 9 बाद 114 धावांचीच मजल मारता आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)