व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयरामचा अंतीम फेरीत पराभव 

हो चि मिन्ह: दुखापतीतून पुनरागमन करणारा भारताचा गुणवान युवा खेळाडू अजय जयरामचा व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळाले असून अंतीम सामन्यात त्याचा इंडोनेशियाच्या शेसार हिरेन याने दोन सेटच्या लढतीनंतर मोडून काढताना स्पर्धेचे विजेतेपद आपल्यानावे केले. तत्पूर्वी, जयरामने जपानच्या यु इगाराशीचे आव्हान दोन सेटच्या लढतीनंतर मोडून काढताना व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर भारताचा युवा खेळाडू मिथुन मंजुनाथचे आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले.
भारताचा स्टार खेळाडू अजय जयरामला मोसमातील पहिल्या जेतेपदाने हुलकावणी दिली. व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन याने 28 मिनिटांत जयरामचा 21-14, 21-10 असा पराभव केला.
या मोसमातलं अजयचं हे सलग दुसरं उप-विजेतेपद ठरलं आहे. याआधी व्हाईट नाईट्‌स इंटरनॅशनल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही अजयला हार पत्करावी लागली होती. मागच्या वर्षात झालेल्या दुखापतीवर मात करुन अजयने यंदाच्या वर्षी चांगलं पुनरागमन केलं आहे. व्हिएतनाम ओपन स्पर्धेत अजयने जपानच्या सातव्या मानांकित यु लागाराशीचा पराभव केला होता.
याआधीच्या फेरीत कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगवर सरळ गेममध्ये मात करणाऱ्या बिगरमानांकित अजय जयरामने उपान्त्य फेरीच्या लढतीत सातव्या मानांकित यु इगाराशीचा 21-14, 21-19 असा 34 मिनिटांत पराभव करीत अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. त्याआधी पहिल्या फेरीत ली ड्युक फॅटचा, दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या पिलियांग फिकिहिलाचा पराभव करणाऱ्या अजय जयरामने तिसऱ्या फेरीत ब्राझिलच्या अग्रमानांकित वायगोर कोएल्होवर सनसनाटी मात करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती.
सलग तिसऱ्या आठवड्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूचा सहभाग असण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन आठवड्यांपूर्वी सौरभ वर्माने रशियन ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. गेल्या आठवड्यांत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर उद्या अजय जयराम व्हिएतनाम स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेतेपदासाठी लढणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)