काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मुलीला मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होता. यामध्ये एक मुलगा एका मुलीला मारत आहे तर बाजूने अन्य कोणीतरी याचा व्हिडीओ बनवत असल्याचे सहज जाणवत आहे.

मारहाण करणाऱ्या मुलाची ओळख पटली आहे. तो दिल्लीतील सहायक पुलिस निरीक्षक ( ASI ) तोमर यांचा मुलगा असून त्याचे नाव रोहित तोमर आहे.  हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या पाहण्यात हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी दिल्ली कमिश्नरला फोन लावून  याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. राजनाथ सिंग यांनी याबाबत ट्विट करत त्याची माहिती दिली, “एका मुलीला एक युवक मारहाण करत असलेला व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्यानंतर मी दिल्ली पोलीस कमिश्नर यांना फोन केला आणि यावर चर्चा करून त्या व्यक्तीवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ”

अगोदरच्या वृत्तानुसार हा व्हिडिओ टिळकनगर ठाण्यातील असून तो मुलगा तेथेच या मुलीला मारहाण करत असल्याचे बोलले जात होते. परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला नकार दिला असून तो व्हिडिओ तेथील नसल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)