व्हाटस ऍपवर लोकांनी 3 महिन्यांत घालवले 8500 कोटी तास

सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) – जगभरातील लोकांनी व्हाटस ऍपवर गेल्या 3 महिन्यांत 8500 कोटी तास घालवल्याची माहिती फोर्ब्जने जाहीर केली आहे. सोशल मीडियाने लोकांना किती वेड लावले आहे, आणि लोक सोशल मीडियावर किती वेळ खर्च करतात याबद्दल ही धक्कादायक माहिती फोर्ब्जने या अहवालात दिली आहे.

जगभरातील लोकांनी गेल्या तीन महिन्यात 8500 कोटी तास व्हाटसऍप वर खर्च केले आहेत म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीने गेल्या तीन महिन्यात सरासरी 11.425 तास व्हाटसऍपवर घालवले आहेत. संपूर्ण जगात सुमारे 1.5 अब्ज लोक व्हाटसऍपचा वापर करतात. व्हाट्‌सऍपच्या 8500 कोटी तासांच्या तुलनेत याच कालावधीत लोकांनी फेसबुकवर 3000 कोटी तास खर्च केले आहेत. म्हणजे फेसबुकपेक्षा लोकांनी व्हाटसऍपवर अडीचपट किंवा 250 टक्के वेळ जास्त घालवला आहे.

व्हाट्‌सऍप, वुईचॅट, फेसबुक, मेसेंजर, पॅंडोरा, यूट्यूब, इन्स्टाग्राम, ट्‌विटर, गूगल मॅप्स आणि स्पॅटिफी हे आजचे सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया ऍप्स असल्याची माहिती फोर्ब्जसाठी सर्वेक्षण करणाऱ्या ऍपटॉपिया कंपनीचे प्रवक्ते ऍडम ब्लॅकर यांनी दिली आहे. मोबाईलवर गेम्स खेळणे हा लहानथोरांचा एक आवडता टाईमपास. अगदी शाळकरी वा शाळेतही न जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी आजोबांपर्यंत मोबाईलवर गेम्स खेळणारे आपण अगदी जातायेता पाहत असतो.

गेम खेळण्यात अमेरिका पहिली
मोबाईलवर वेळ घालवण्यात अमेरिकन लोकांचा प्रथम क्रमांक लागतो. प्रत्येक अमेरिकन दररोज सरासरी साडेतीन तास मोबईलवर घालवतो. क्‍लॅश ऑफ क्‍लॅन्स हा सध्या अमेरिकनांच सर्वाधिक आवडता गेम आहे.

गेल्या तीन महिन्यात अमेरिकन लोकांनी क्‍लॅश ऑफ क्‍लॅन्स खेळण्यात 383 कोटी तास घालवले आहेत. त्याच्यानंतर टाकिंग टॉम, कॅंडी क्रश सागा, फॉर्टीनाइटस, लॉर्डस मोबाईल, सबवे सर्फर्स, हेलिक्‍स जम्प, स्लिदर डॉट, आयईओ, प्यूब मोबाईल आणि फिशडम यांचे क्रमांक लागतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)