व्हाईट हाऊसमधील दिवाळीची 15 वर्षांपासूनची परंपरा मोडीत

न्यूयॉर्क – अमेरिकेत सिनेटच्या मध्यवर्ती निवडणुका असल्याने यंदा व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात येणार नाही. गेल्या 15 वर्षांपासून व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात येत होती. मात्र, यंदाच्या वर्षी निवडणुकाच्या कारणाने डोनाल्ड ट्रम्प दिवाळी साजरी करणार नाहीत.

व्हाईट हाऊसमध्ये प्रथम जॉर्ज बुश यांनी दिवाळी साजरी केली. त्यानंतर 2003 पासून बराक ओबामांनी त्यात खंड न पाडता दिवाळी साजरी केली. ही परंपरा ट्रम्प यांनी गेल्या वर्षी ओव्हल कार्यालयात पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरी करुन कायम ठेवली होती.

मात्र, यावर्षी सिनेटच्या निवडणुकीमुळे ट्रम्प दिवाळी साजरी करणार नाहीत. त्यामुळे अमेरिकेचे सचिव माईक पोम्पे यांनी आज एका संदेशाद्वारे दिवाळीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेसाठी योगदान देणाऱ्या साऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, असा संदेश त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)