व्हाईट लेबल एटीएम आणि बँका यांच्यामधील भागीदारीची व्याख्या बदलेल – संजीव पटेल

कोल्हापूर – बँका आणि अन्य आर्थिक सेवा संस्थांच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी, लोकांना त्यांच्या जवळपास असणारे एटीएम हे नेहमीच एक मुख्य ठिकाण ठरत आहे. 8500 एटीएम केंद्रे आणि एटीएम नेटवर्क व्यवस्थापन करण्यासाठी कार्यरत असणारे तज्ञ अशा व्यापक एटीएम नेटवर्कना बळकटी देऊन को-ऑपेरेटिव्ह बँकांचे स्वरूपच पालटणारे एटीएम देऊन आम्ही आनंदित आहोत. नेटवर्क व्यवस्थापनाचे आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या मार्गांनी व्यवस्थापन करू इच्छिणाऱ्या को-ऑपेरेटिव्ह बँकांसाठी आमचे डब्ल्यूएलए सोल्युशन उपयोगी आहे.

एटीएम व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 1/3 पेक्षा कमी खर्चात आणि शून्य कॅपेक्स किंमतीत बँकांना हव्या असलेल्या उच्च क्षमतेच्या भौगौलिक क्षेत्रात त्वरित त्यांची एटीएम उर्फ ब्रँड ठसा कार्यान्वयित करता येऊ शकत असल्याने हे सोल्युशन हा एक हमखास यशस्वी मार्ग आहे. को-ऑपेरेटिव्ह बँकाना त्यांचा मूळ खर्च आणि ऑपरेशनल फायदे या सोल्युशनमुळे प्राप्त करता येऊ शकणार असल्याने; नेटवर्क विस्ताराचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. या मॉडेलमुळे भारतातील व्हाईट लेबल एटीएम आणि बँका यांच्यामधील भागीदारीची व्याख्या बदलेल आणि याबाबत आम्ही अतिशय सकारत्मक आहोत. असं प्रतिपादन टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव पटेल यांनी केलंय.

टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड , इंडीकॅश  ब्रँडनेम अंतर्गत भारतातील पहिले आणि सर्वात मोठे व्हाईट लेबल एटीएम नेटवर्क असून त्यांनी आज को-ऑपेरेटिव्ह बँकांसाठी परिवर्तनशील अशा डब्ल्यूएलए सोल्युशन्सची आज घोषणा केली. या अद्वितीय सोल्युशन्समुळे देशात को-ऑपेरेटिव्ह बँकांची एटीएम स्थापना पद्धत नव्याने रचली जाईल. ही नवीन सोल्युशन्स बँकांना वाजवी दरात झटपट एटीएम नेटवर्क विस्तारण्याची संधी देईल. को-ब्रॅन्डींग अरेंजमेंटच्या सहाय्यने सध्याच्या  8500 इंडीकॅश नेटवर्कला चालना मिळणार असल्याचंही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)