व्रतवैकल्यांचे महत्व सांगणारा श्रावण महिना

संदीप राक्षे
रिमझिम पावसाची बरसात आणि व्रतवैकल्यांचे महत्व सांगणारा श्रावण महिना धार्मिक साधनसुचितेच महत्व निश्‍चित सांगतो. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने साताऱ्यातील निवडक महादेव मंदिरांची महती आणि आख्यायिका आजपासून आपल्या भेटीला.
कोटेश्वर मंदिर -सातारा शहराच्या वायव्य कोपऱ्यातून शाहुपुरी या उपनगरांकडे निघालो की शुक्रवार पेठेच्या कोपऱ्यावर पेशवेकालीन भव्य महादेवाचे मंदिर लक्ष वेधून घेतो. भव्य पुष्करिणी काळ्या पाषाणाच्या घडीव दगडाच्या भिंती आणि विस्तीर्ण परिसर यामुळे कोटेश्वर मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. साताऱ्यापासून दहा मैलावर असणाऱ्या लिंब गावातील स्वयंभू कोटेश्वर महादेव भक्तांसाठी शुक्रवार खणीच्या परिसरात प्रकट झाले आणि कोटेश्वर नावानेच प्रसिद्ध झाले. दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी स्थापन केलेल्या कोटी शिवलिंगामध्ये एक कोटीवे शिवलिंग हे लिंब गावातील असल्याचा पौराणिक दाखला दिला जातो. पानिपतच्या 1761 तिसऱ्या रणसंग्रामात मराठ्यांना एकत्र आणण्यासाठी थोरल्या गादीचा मान सातारा की कोल्हापूर या विषयावर जो राजकीय खल झाला तो कोटेश्वराच्या साक्षीने झाला. येथील मंदिरालगतचा दगडी पार पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याची नोंद आहे. आज मंदिरात पुजारी घराण्याची आठवी पिढी पूजाअर्चा करण्यासाठी सेवेत आहे. पहाटे अडीच , दुपारी अडीच असा दोन वेळा महारूद्राभिषेक, आरती, पोशाख, नंदीपूजन असे धार्मिक विधी श्रावणमासात होणार असल्याचे येथील पुजारी संतोष पुजारी यांनी सांगितले. श्रावणी सोमवार निमित्त सुवासिनींची पहाटेपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. श्रावणात कोटेश्वर महादेवाच्या दर्शनाचे मोठे महत्व सांगितले जाते. मंदिरात येत्या 7 सप्टेंबरला मंदिर परिसरात दोन लाख बेलपत्र अर्पण सोहळा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)