व्यावसायिक सरोगसीला पूर्णविराम (भाग-१)

सरोगसी रेग्युलेशन विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले आहे. या कायद्याच्या माध्यमातून सरोगेट महिलांच्या शोषणाला आळा घालण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. भाडोत्री गर्भाशय घेऊन मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे सरकारने काही दिवसांपूर्वीच मान्य केले होते. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी विभागांमध्ये परिस्थिती बिघडत चालली होती. हा कायदा झाल्यामुळे पैशांच्या मोबदल्यात मातेला आपल्या ममतेचा सौदा करावा लागणार नाही, अशी आशा आहे.

भाडोत्री गर्भाशय घेऊन मूल जन्माला घालण्याची प्रक्रिया म्हणजे सरोगसी प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या दृष्टीने एक विधेयक लोकसभेत नुकतेच संमत करण्यात आले आहे. सरोगेट मदर म्हणून काम करणाऱ्या म्हणजेच आपले गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलांचे होणारे शोषण रोखण्यासाठी हा कायदा अस्तित्वात येण्याची गरज वर्तविण्यात येत होती. सरोगसी कायदा कडक करण्याचे कारण म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून भारत “सरोगसी हब’ म्हणून चर्चेत आला आहे. सरोगसीच्या नावावर अनेक व्यवसाय देशात सुरू आहेत. एवढेच नव्हे तर सरोगसी केल्यानंतर गर्भात मुलगी असल्याचे आढळल्यास भ्रूणहत्या होत असल्याचेही समोर आले आहे. सरोगसीच्या माध्यमातून केवळ भारतातच सुमारे सात अब्ज रुपयांचा व्यवसाय होत असल्याचे उघड झाले आहे. अन्य देशांच्या तुलनेत सरोगसीची प्रक्रिया भारतात कमी खर्चिक आहे. सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालण्यासाठी अवघे दोन ते पाच लाख रुपये एवढाच खर्च भारतात येतो. सरोगेट आई जर निःशुल्क उपलब्ध होत असेल, तर अवघ्या 75 हजार ते एक लाख रुपयांत ही प्रक्रिया करता येते.

भाडोत्री गर्भाशय घेऊन मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारी, त्या नियमित करणारी कोणतीही अधिकृत यंत्रणा अस्तित्वात नाही, हे सरकारने नुकतेच मान्य केले होते. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी विभागांमध्ये सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती करून घेण्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्या. अशा व्यवहारांमध्ये संबंधित महिलेचे अनेकांकडून आर्थिक शोषण केले जाण्याची शक्‍यता अधिक असते. तसे पाहायला गेल्यास कृत्रिम गर्भधारणेचा इतिहास दोन शतकांपूर्वीचा आहे; परंतु भारतात यासंबंधी कोणताही कायदा आजअखेर अस्तित्वात नव्हता. आकडेवारीचा विचार करता, भारतात दरवर्षी दोन हजार परदेशी मुलांचा जन्म होतो आणि त्यांची सरोगेट आई भारतीय असते. सरोगसीची मोठी बाजारपेठ असा लौकिक गेल्या काही वर्षांपासून भारताला प्राप्त झाला होता. एकीकडे सरोगसीच्या तंत्रज्ञानाद्वारे अपत्यप्राप्ती झालेले आईवडील आनंदात असतात, तर दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारीही वाढत असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यावसायिक सरोगसीला पूर्णविराम (भाग-२)

काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले होते की, सुविधा म्हणून विकसित झालेले हे तंत्रज्ञान आता फॅशन म्हणून वापरात येऊ लागले आहे. ज्या सेलिब्रिटींना पूर्वी मुले झाली आहेत, अशी दाम्पत्येही सरोगसीचा वापर करीत आहेत. सुषमा स्वराज यांचे विधान अनेकांना कडवट वाटले; परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज होतीच.

– अॅड. प्रदीप उमाप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)