व्यावसायिक वाहनांची आता दोन वर्षांनंतर “फिटनेस’ तपासणी

पुणे – नव्याने व्यावसायिक वाहन म्हणून (ट्रान्सपोर्ट) नोंदणी करतेवेळी “फिटनेस टेस्ट’ करण्याची सक्ती मागे घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने मोटार वाहन अधिसूचनेत सुधारणा केली असून नव्या व्यावसायिक वाहनांना आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षानंतर “फिटनेस टेस्ट’ करण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे नव्याने नोंद करणाऱ्या व्यावसायिक (ट्रान्सपोर्ट) वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक वापरासाठी खरेदी केलेल्या वाहनांची (ट्रान्स्पोर्ट) नोंदणी करताना त्या वाहनांची फिटनेस टेस्ट करावी तसेच, नॅशनल परमिट असलेल्या वाहनांमध्ये प्रवासादरम्यान दोन चालक असावेत, अशी सक्ती यापुर्वी होती. यानुसार, पुणे आरटीओ कार्यालयाकडून दिवे येथील टेस्टिंग ट्रॅकवर “फिटनेस टेस्ट’ घेतली जाते. तर, मोशी येथे पिंपरी-चिंचवड कार्यालयातील वाहनांची टेस्ट घेतली जात आहे. त्यासाठी दोन्ही कार्यालयांकडून वाहनधारकांना “अपॉइंटमेंट’ दिली जात आहे. परिणामी, वाहन नोंदणीसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता केंद्रीय मंत्रालयाने मोटार कायद्यात केलेल्या सुधारणामुळे नवीन वाहनांची नोंदणी करतेवेळी “फिटनेस टेस्ट’मधून वाहनधारकांची सूटका होणार आहे. नवीन वाहनांची पहिल्या आठ वर्षांत दर दोन वर्षांनी, तर आठ वर्षांनंतर दरवर्षी ही टेस्ट करावी लागणार आहे. तसेच, वाहन नोंदणीनंतर दोन वर्षांनी पहिली टेस्ट करण्याची मुभाही देण्यात आली आहे. यामुळे वाहतूकदारांना दिलासा मिळाला असल्याचे मत राज्य माल प्रवासी वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केले.

-Ads-

कागदपत्रे दाखवा डिजिटल स्वरूपात
नॅशनल परमिटच्या गाड्यांना विशिष्ट रंग देणे, वाहनाच्या कागदपत्रांची मूळ प्रत बाळगण्याचे यापूर्वी सक्तीचे होते. त्यामुळे अनेकदा पोलीस कागदपत्रे ताब्यात घेऊन अडवणूक करीत, अशी माल वाहतूकदारांची तक्रार होती. यावर वाहनांची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात दाखवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)