व्यावसायिक बचतगटांना सामुहिक कर्जवितरण

कराड – कराड नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत रोजगार व स्वयंरोजगार अपंगाच्या माध्यमातून सामुहिक कर्ज वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. श्री गणेश व्यवसाय गट व प्रताप व्यवसाय गट यांना पारंपरिक व्यवसायासाठी प्रत्येकी 2.5 लाख याप्रमाणे 5 लाखाचे सामुहिक कर्जाचे विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या कराड शाखेमार्फत उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, कराड व विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचे शाखाधिकारी मोहसिन शिरगुप्पेक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.

पालिकेतर्फे स्वयंरोजगारासाठी बॅंकेमार्फत वैयक्तिक व्यवसायासाठी 2 लाख रूपयांपर्यंत व गटासाठी 10 लाख रूपयांपर्यंत सवलतीच्या व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. वेळेवर कर्ज परतफेड करून व्याज अनुदानाचा लाभ कर्जदार लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जयवंतराव पाटील यांनी केले. मोहसिन शिरगुप्पेक यांनी बॅंकेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच यशवंत चॉरिटेबल ट्रस्ट पार्लेचे प्रतिनिधी प्रकाश नलवडे यांनी उद्योगातील विविध संधीबाबत मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सर्व लाभार्थीना त्यांच्या व्यवसाय वृद्धिसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शासनाचे विविध उपक्रम लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक काम केले जात असल्याबाबत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी समाधान व्यक्‍त केले. सदर कर्ज योजनेचा जास्तीत जास्त लाभ कराड शहरातील नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन तांत्रिक तज्ञ गितांजली यादव यांनी केले. कार्यक्रमासाठी शुभम पजई, दिपाली रेपाळ उपस्थित होते. तांत्रिक तज्ज्ञ गणेश जाधव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)