व्यावसायिकावर काचेच्या तुकड्याने जिवघेणा हल्ला

पुणे,दि.30(प्रतिनिधी)- दरमहा दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करत दोघांनी आईस्क्रीम व्यावसायिकावर काचेच्या तुकड्याने जिवघेणा हल्ला केला. हा प्रकार पुण्यातील उत्तमनगर परिसरात 28 मार्च रोजी घडला. याप्रकरणी चिराग कानगुडे (वय-23) यांनी उत्तमनगर पोलीसात फिर्याद दिली असून आरोपी प्रतिक संजय नलावडे (वय-19, रा.कोंढवे धावडे, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे कोंढवे धावडे परिसरात आईस्क्रीम पार्लर आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आणि त्याचा एक मित्र आईस्क्रीम पार्लरवर आले होते. त्यांनी फिर्यादीस, “मी येथील भाई प्रतिक नलावडे आहे आणि मला दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल” असे सांगितले. याचवेळी आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली आणि दुकानातील काच घेऊन त्यांच्या डोक्‍यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी वार चुकवल्याने त्यांच्या खांद्यावर काचेने वार केले. यावेळी आरोपीसोबत असणा-याने गल्ल्यातील एक हजार रुपये काढून नेले. सहायक पोलीस निरीक्षक पिंगळे अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)