व्यावसायिकांचीही कोंडी

शाहूपुरीची सध्या चारही बाजुने कोंडी झाली असल्याचा फटका परिसरातील छोट्या व्यावसायिकांना आणि दुकानदारांनाही बसला आहे. या दुकानदारांकडे येणारी वाटच बंद झाल्याने त्यांचा व्यवसाय निम्यावर आला आहे.विशेषत: कोटेश्‍वर कॉलनी आणि बोधे हॉस्पीटल परिसरात नागरिकांच्या दैनंदिन गरजा पुर्ण करणारे दूध विक्रेते,केश कर्तनालय,औषधे असे अनेक व्यवसाय आहेत.

परिसरातील लोकांना त्यांची सवय झाली आहे.पण आता रस्ते आणि पूल बंद झाल्याने ग्राहकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणेच अशक्‍य आहे.त्यांना पर्याय शोधून आपल्या गरजा पुर्ण कराव्या लागत आहेत.पण त्याचा फटका नेहमीच्या दुकानदारांना बसला आहे.रोजचा दुधाचा खप निम्यावर आल्याचे या भागातील एक विक्रेता सांगतो.पुलांचे काम होईपर्यत नेहमीच्या ग्राहकांना पर्यायी दुकानदारांची सवय झाल्याने या दुकानदारांना आपला व्यवसाय पुर्णपणे बंद होण्याची भिती वाटत आहे.याची दखल तरी स्थानिक नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन घेणार आहे का?


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)