व्यावसाईकाला धमकावत खंडणी मागणाऱ्या सराईतास अटक

पुणे- एका गॅंगस्टर टोळीचा शुटर असल्याचे सांगत सराईत गुन्हेगाराने एका खासगी कंपनीत उच्च पदावर काम करत असलेल्या अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागितली. या सराईत गुन्हेगाराला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. 22 ते 25 ऑगस्टदरम्यान कोथरुड येथे ही घटना घडली.

दिपक किसन पोटफाडे (वय 30, रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे, यासंदर्भात एका 47 वर्षीय अधिकाऱ्याने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटफाडे याने या व्यावसायिकाला 22 ते 25 ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या मोबाईलवर फोन केला. “आपण एका गॅंगस्टर टोळीचा शुटर आहे, तु मला एक लाख रुपयांची खंडणी दे अन्यथा तुला ठार मारुन टाकीन’ अशी धमकी त्याने दिली. याबाबत अधिकाऱ्याने फिर्याद दिल्यानंतर कोथरुड पोलिसांनी पोटफाडे याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)