व्यायाम शाळा साहित्याची मोजदाद होणार

Young man exercising on rowing machine in gymnasium

पिंपरी -पिपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायाम शाळांना किती साहित्याचे वाटप झाले आणि सद्यस्थितीत किती साहित्य वापरात आहे, याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी मागवली आहे. क्रीडा विभागाचा मेकओव्हर करण्याचे महापौर जाधव यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. या विभागाची कामगिरी समाधानकारक नसल्याने क्रीडा अधिकारीपदी क्रीडापटूची नियुक्‍ती करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यादृष्टीने चाचपणी देखील सुरू आहे. व्यायाम शाळांसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्चून साहित्य दिले, तरी अपुरे असल्याची सातत्याने ओरड होते. यामुळे महापौर जाधव यांनी व्यायाम शाळांचे ऑडिट करण्याचे मनावर घेतले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)