व्यायामशाळा स्थलांतरणास विरोध

Young man exercising on rowing machine in gymnasium

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून कार्यान्वयीत करण्यात आलेली व्यायामशाळा इतरत्र स्थलांतरित करु नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महापालिका स्थापनेपासून व्यायामशाळा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मुख्यालयातील या व्यायामशाळेमध्ये महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी सकाळी लवकर व संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर व्यायाम, योगासने इत्यादी व्यायाम प्रकार करत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारिरीक स्वास्थ्याबरोबरच त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत आहे. सद्य:स्थितीमध्ये या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक सोई सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परंतु, या व्यायामशाळेचे स्थलांतर प्रस्तावित असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेचा संपूर्ण डेटा डिजीटल स्टोअर करण्याकरीता निविदा काढण्यात आलेली आहे. या निविदाचे काम या व्यायामशाळा स्थलांतरीत करुन ती जागा संबंधित ठेकेदारास देण्याचे नियोजन असून हा ठेका भाजपाच्या एका नगरसेवकाच्या एका निकटवर्तीने घेतल्याचे समजते. त्यामुळे ही व्यायाम शाळा स्थलांतरित करुन कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार आहे. हा प्रकार गंभीर असून केवळ भाजप नगरसेवकाच्या निकटवर्तीय ठेकेदाराची सोय म्हणून ही व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन महापालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय करु नये.

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी व्यायाम शाळा इतरत्र स्थलांतरीत करण्यात येऊ नये. याउलट महापालिकेच्या इतर व्यायाम शाळेसारखे या व्यायाम शाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात यावीत, अशी मागणी साने यांनी केली आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)