व्याप्त काश्‍मीरात पाकिस्तानी राजकारण्यांनी चालवले आहे शोषण

डॉ मुसाफिर हसन खान यांचा आरोप

मुज्जफराबाद – व्याप्त काश्‍मीरात पाकिस्तानी राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात लूट आणि शोषण चालवली आहे. व्याप्त काश्‍मीरात पाकिस्तानचा एकूणच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात केला जात असून येथील लोकांचे जीणे मुष्किल झाले आहे असा आरोप पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरातील एक राजकीय नेते डॉ मुसाफिर हसन खान यांनी केला आहे.

युरोपात लीड येथे जम्मू काश्‍मीर नॅशनल इंडिपेंडेन्स अलायन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत जम्मू काश्‍मीर लिबरेशन लीगच प्रमुख डॉ मुसाफिर खान यांनी हा आरोप केला.पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरचे पंतप्रधान फारूख हैदर यांनीही व्याप्त काश्‍मीरात पाकिस्तान सरकार बेकायदेशीरपणे सत्ता गाजवत आहे असा आरोप केला आहे त्या आरोपाचे या परिषदेत जोरदार समर्थन करण्यात आले.

डॉ मुसाफिर खान म्हणाले की पाकिस्तानच्या राजकीय पक्षांनी व्याप्त काश्‍मीरात आपआपली दुकाने थाटली असून त्याद्वारे त्यांनी व्याप्त काश्‍मीरातील जनतेचे शोषण चालवले आहे असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की व्याप्त काश्‍मीरचा प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे पण पाकिस्तान सरकारने या भागाला दुय्यम व भेदभाव करणारी वागणूक दिली असल्याने या भागातील लोकांची जीवन नरकमय झाले आहे. त्यांना प्राथमिक सुविधाही मिळणे दुरापास्त झाले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)