व्यापाऱ्याला 9 लाखांचा गंडा

पिंपरी – कंपनीचा खोटा पत्ता देऊन त्यावर स्टील उतरवून घेऊन एका व्यापाऱ्याची नऊ लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडी येथे उघडकीस आली.

या प्रकरणी हितेन रावल, अब्दुल्ला चौधरी, यादअली ऊर्फ वाहिद, कमलेश मिश्रा, अतुल देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रौनक जयेश पारेख (वय-26, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-

एक्‍युरेट इंजिनिअरिंग या कंपनीने फोनद्वारे 12 लाख सात हजार 105 रुपयांच्या स्टीलची ऑर्डर पारेख यांना दिली. आरोपींनी दिलेल्या तळवडे, चिखलीतील पत्त्यावर पारेख यांनी स्टेनलेस स्टीलचा माल पोहच केला. मात्र, एक्‍युरेट नावाची कोणतीही कंपनी नसल्याचे उघड झाले. उपनिरीक्षक आर. एम. भोये तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)