व्यापाऱ्याला सव्वा कोटींचा गंडा

पिंपरी – पोर्से आणि लंबोर्गी कंपनीच्या कार विकण्याच्या बहाण्याने एका इसमाने मध्यस्थी करत सांगवी येथील एका व्यापाऱ्याची 1 कोटी 15 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2017 ते 28 नोव्हेंबर 2018 या कालावधीत झाला.

विजयकुमार गोपीकुमार रामचंदानी (वय-48, रा. आय फेस सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिलीप उर्फ विकी जगदीश शर्मा (वय-37, रा. साई एम्बेंस, गोविंद गार्डनसमोर, पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप हा महागड्या गाड्या विकणारा एजंट आहे. त्याने फिर्यादी विजयकुमार यांना पोर्से कंपनीची टू सीटर कार दाखवली. ती कार विजयकुमार यांना पसंत पडली. दिलीप याने या गाडीची सर्व मूळ कागदपत्रे दाखवली. त्यामुळे विजयकुमार यांचा दिलीप यांच्यावर विश्‍वास बसला. यातून पुढे या गाडीचा 62 लाख रुपयांना घेण्याचा व्यवहार झाला. दिलीपने पोर्से कंपनीची एक कार विजयकुमार यांना दाखवली. विजयकुमार यांना ती कार देखील पसंत पडली. लिंबोर्गी कार 65 लाख रुपयांना घेण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार विजयकुमार यांनी 62 लाख रुपये दिलीप याच्या बॅंक खात्यात “आरटीजीएस’द्वारे पाठवले.

त्यानंतर काही कालावधीनंतर उर्वरित 19 लाख रुपये देखील “आरटीजीएस’द्वारे दिलीप याच्या खात्यावर पाठवले, असे विजयकुमार यांनी एकूण 1 कोटी 15 लाख 83 हजार दिलीप याच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर दिलीप दोन्ही कार आणि त्यांची मूळ कागदपत्रे विजयकुमार यांच्या नावावर एका आठवड्यात करून देतो, असे म्हणून गेला. एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर विजयकुमार यांनी दिलीपला फोन केला असता तो वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजयकुमार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)