व्यापाऱ्याला लुटणारी टोळी निघाली नगर तालुक्‍यातील

स्थानिक गुन्हे शाखेकडून आठ जणांपैकी एकाला अटक

नगर: पुण्याच्या पुरंदर तालुक्‍यातील पिपंरे खुर्द येथील व्यापारी दीपक थोपटे यांना नगरमध्ये लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. अरुण ज्ञानदेव चव्हाण (वय 30, रा. बुरूडगाव, नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याकडून लुटीपैकी 3 लाख 3 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चव्हाण याने या लुटीतील साथीदारांची नावे सांगितली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाळू नंतर काळ, करण नंतर काळे (दोघे रा. वडगावगुप्ता, नगर), नागेश निंदुड्या चव्हाण, रामायण ज्ञानदेव चव्हाण, मीतवान ज्ञानदेव चव्हाण (तिघे रा. बुरूडगाव, नगर), नंदन झुबेदार काळे व आदेश नंदन काळे (दोघे रा. खोसपुरी, ता. नगर) या टोळीने ही लूट केली आहे.

व्यापारी दीपक थोपटे व त्यांचा मित्र कैलास गोपनर यांना स्वस्तात सोने देतो, असे अमिष दाखवून नगरमध्ये सोने घेण्यास बोलविण्यात आले होते. नगर तालुक्‍यातील खोसपुरी शिवारातील डोंगराळ भागात त्यांना या आठ जणांच्या टोळीने लुटले होते. थोपटे व गोपनर यांना या टोळीने घेरून मारहाण केली.

या टोळीने त्यांना 9 लाख 84 हजार रुपयांचे ऐवज लुटला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला होता. शनिवारी झालेल्या या घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दोन दिवसांत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)